मिरा-भाईंदरमध्ये पोटमाळ्यांचे फेरसर्वेक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदरमध्ये पोटमाळ्यांचे फेरसर्वेक्षण
मिरा-भाईंदरमध्ये पोटमाळ्यांचे फेरसर्वेक्षण

मिरा-भाईंदरमध्ये पोटमाळ्यांचे फेरसर्वेक्षण

sakal_logo
By

भाईंदर, ता. २८ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमधील औद्योगिक कारखान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारखान्यात बांधलेल्या पोटमाळ्यांना महापालिकेने दंडासह करआकारणी केली होती. या कर आकारणीत सवलत देऊन दंडाची रक्कम माफ करावी, असा प्रस्ताव महासभेने मंजूर केला आहे. त्यानुसार कर आकारणीचे फेर सर्वेक्षण करण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.
मिरा-भाईंदर क्षेत्रात अनेक औद्योगिक वसाहती आहेत. त्यातील कारखानदारांनी गरजेनुसार कारखान्यात पोटमाळ्याचे बांधकाम केले. महापालिकेने आता या पोटमाळ्यांना दंडासह करआकारणी केली आहे. परिणामी कारखानदारांना दोन ते तीन लाख रुपयांपर्यंतची कराची देयके प्राप्त झाली आहेत. त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे उद्योगांचे आर्थिक कंबरडे मोडले होते, या धक्क्यातून उद्योग पूर्णपणे बाहेर आलेला नाही. अशात लाखो रुपयांची देयके भरणे उद्योजकांना शक्य नाही. त्यामुळे कर आकारणीत सवलत द्यावी, अशी मागणी औद्योगिक संघटनांनी आयुक्तांकडे केली होती. मात्र त्याचा विचार झाला नाही, पण दोन दिवसांपूर्वीच झालेल्या महासभेत भाजपचे नगरसेवक सुरेश खंडेलवाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला. कारखान्यांमध्ये असलेले पोटमाळे वाढीव बांधकामात गृहीत धरणे चुकीचे आहे, कारण बांधकाम नियंत्रण नियमावलीनुसार पोटमाळे हे मोफत चटई क्षेत्रफळात गणले जाताता, शिवाय बहुतांश पोटमाळ्यांचा वापर गोदाम किंवा कामगारांना झोपण्यासाठी केला जातो. तसेच पोटमाळ्यांना कर आकारणी करण्याबाबत महापालिकेने कोणतेही धोरण निश्चित केलेले नाही. त्यामुळे पोटमाळ्यांना केवळ सामान्य करानुसार आकारणी करून त्यावरील दंड माफ करावा, असा प्रस्ताव खंडेलवाल यांनी महासभेत मांडला, त्याला सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिल्याने सभागृहाने प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार प्रशासन पोटमाळ्यांचे फेर सर्वेक्षण करणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94777 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..