मुंबई विद्यापीठासमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठासमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन
मुंबई विद्यापीठासमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन

मुंबई विद्यापीठासमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन

sakal_logo
By

धारावी, ता. २८ (बातमीदार) : राजस्थानमधील जालोर येथे घडलेल्‍या दलित विद्यार्थ्याच्‍या हत्‍येचा निषेध करण्यासाठी विविध विद्यार्थी संघटनांनी मुंबई विद्यापीठासमोर आंदोलन केले. या वेळी दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती, शाहीर, गायक यांनी डफ वाजवित निषेधार्थ गाणी म्हटली. शेवटी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे जाहीर वाचन करण्यात आले. त्यानंतर जातीय उतरंडीची प्रतिकात्मक मडकी फोडण्यात आली.
या आंदोलनात पुरोगामी, समतावादी, आंबेडकरी, डाव्या, विद्यार्थी व युवक संघटना सहभागी झाल्या होत्या. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रवीण मांजलकर, जनवादी महिला संघटनेच्या सुगंधी फ्रान्सिस, सत्यशोधक संघटनेचे विद्यार्थी विवेक मोरे, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समितीचे शाहीर शशांक कांबळे, अश्विन कांबळे, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे अमीर काझी, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इन्दियचे तब्रेज, गौतम यांनी या आंदोलनाचे नेतृत्‍व केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94781 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..