ग्रामस्थांनी श्रमदानातून भरले खड्डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामस्थांनी श्रमदानातून भरले खड्डे
ग्रामस्थांनी श्रमदानातून भरले खड्डे

ग्रामस्थांनी श्रमदानातून भरले खड्डे

sakal_logo
By

कासा, ता. २८ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कासा-सोनाळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून सोनाळे, खाणीव परिसरातील गावपाड्यांना जोडणारा हा रस्ता असल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल होत होते. या रस्त्यावरून दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. त्यात गणेशोत्सव जवळ आल्याने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी विवाळवेढे ग्रामपंचायतीमार्फत तालुका प्रशासनाकडे केली होती. पण यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने रविवारी सोनाळे गावातील ग्रामस्थांनी श्रमदान करत रस्त्यावरील खड्डे बुजवायचे सुरू केले आहे. यासाठी कैलास माळी, जयराम सातवी, किशोर धोदडे, अजय सातवी, संजय कोदे, अभिजित कोरडा, अजय धांगडा, दिनेश बेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खड्डे भरले गेले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94787 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..