विसर्जनासाठी ‘ऑनलाईन टाईम स्लॉट’ बुकिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जनासाठी ‘ऑनलाईन टाईम स्लॉट’ बुकिंग
विसर्जनासाठी ‘ऑनलाईन टाईम स्लॉट’ बुकिंग

विसर्जनासाठी ‘ऑनलाईन टाईम स्लॉट’ बुकिंग

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २८ : ठाणे महापालिकेच्यावतीने गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग सुरू झाले आहे. गणेशभक्तांच्या सुविधेकरिता व अनावश्यक गर्दी टाळण्याकरिता स्लॉट बुकिंग करून गणेश विसर्जन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी भाविकांना केले आहे.

महापालिकेच्या संकेतस्थळावर स्लॉट बुकिंगची सुविधा शनिवारपासून (ता. २६) सुरू झाली असून सर्व कृत्रिम तलाव व मूर्ती स्वीकृती केंद्रांकरिता दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेतील स्लॉट खुले करण्यात आलेले आहेत. सदर स्लॉट दीड, पाच दिवसांचे, गौरी विसर्जन, सात दिवसांचे व अनंत चतुर्दशी दिनी विसर्जनाकरिता उपलब्ध असणार असून त्या त्या दिवसाच्या आदल्यादिवशी रात्री १२ वाजता स्लॉट बुकिंग बंद होणार आहे.

ऑनलाईन नोंदणी सुरू
कोव्हिड १९ साथरोगाच्या पार्श्र्वभूमीवर गर्दीचे नियंत्रण करून नागरिकांना गणेशमूर्तींचे विसर्जन सुलभतेने करता यावे, याकरिता ऑनलाईन स्लॉट बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सार्वजनिक मंडळे व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरिता नागरिकांना ठाणे पालिकेच्या http://tmc.visarjanslots.com/ वर स्लॉट बुक करावे, असे पालिकेने आवाहन केले आहे.

नोंदणीसाठीची प्रक्रिया :
- भाविकांनी प्राथमिक माहिती व मूर्तीचा प्रकार याप्रमाणे माहिती सादर करून स्लॉट बुक करावा.
- बुकिंग झाल्यावर त्यांना क्युआर कोडसह पावती उपलब्ध होईल.
- सदर पावतीची प्रिन्ट किंवा मोबाईलमधील डिजिटल प्रत विसर्जनस्थळावर सादर करून नागरिकांना सुलभतेने मूर्ती विसर्जन करता येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94789 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..