खड्डे बुजवण्यासाठी बाप्पा रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डे बुजवण्यासाठी बाप्पा रस्त्यावर
खड्डे बुजवण्यासाठी बाप्पा रस्त्यावर

खड्डे बुजवण्यासाठी बाप्पा रस्त्यावर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना ठाण्यातील बहुतेक अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे विघ्न कायम आहे. याकडे ठाणे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी साक्षात गणरायाच रस्त्यावर उतरल्याचे ठाणेकरांनी पाहिले. ठाणे शहर काँग्रेसने हे अनोखे आंदोलन करत महागिरी कोळीवाड्यातील खड्डे बुजवले.
ठाण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत वारंवार निदर्शनास आणूनही ठाणे महापालिकेतील प्रशासन अद्याप जागे झाले नसल्याचे चित्र ठाण्यात जागोजागी दिसत आहे. खड्डे बळींची संख्या वाढूनही प्रशासन ढिम्म असल्याने काँग्रेसने रविवारी ठाण्यात अनोखे आंदोलन केले. गणपती बाप्पासोबत मूषक अशी मिरवणूक काढत काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागिरी कोळीवाडा येथील खड्डे बुजवले.
----------------------
सर्व तंत्रज्ञान नापास
खड्डे बुजवण्यासाठी यावर्षी चार कोटींचा खर्च केला जात आहे. मात्र, खड्डे ‘जैसे थे’ आहेत. खड्ड्यांवर तात्पुरत्या स्वरूपात मुलामा टाकला जात आहे. कधी कोल्डमिक्स, कधी हॉट मिक्स तर कधी आणखी काही वेगळे तंत्रज्ञान वापरले जात आहे. मात्र, हे सर्व तंत्रज्ञान फेल होत आहेत. त्यामुळे ठाणेकरांच्या कररूपी पैशांचा चुराडाच करण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू असल्याचेच दिसत आहे, असा आरोप शहर काँग्रेस सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी यावेळी केला.
या आंदोलनात शहर कॉंग्रेस उपाध्यक्ष धर्मवीर मेहरोल, ओबीसी विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे, अ‍ॅड. हिदायत मुकादम, किशोर कांबळे, प्रवीण खैरालिया, अफजल तलवलकर, सुरेन भोई, हेमंत भोई, दिनेश मेहरोल, भरत भोई, देवीचंद भक्त, संजय घाग, साहिल सूर्यवंशी, राजा चिंडालिया, अजय चिंडालिया आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94800 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..