उरणकरांच्या सेवेसाठी कटिबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरणकरांच्या सेवेसाठी कटिबद्ध
उरणकरांच्या सेवेसाठी कटिबद्ध

उरणकरांच्या सेवेसाठी कटिबद्ध

sakal_logo
By

उरण, ता. २८ (वार्ताहर) : राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुन्हा भाजप, शिवसेनेचे सरकार आले आहे. कोकणातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील राहणार आहे. आमदार महेश बालदी यांनी उरणकरांच्या समस्या मांडल्या आहेत. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्याचा मंत्री म्हणून कटिबद्ध राहणार, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
उरण तालुका भाजपतर्फे जेएनपीए वसाहतीमधील प्रांगणात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचा सत्कार समारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता. २८) करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या भाताला योग्य दर मिळावा, यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ठिकठिकाणी भातखरेदी केंद्र उभारण्यात आले; परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्यांना बोनस दिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आजचा दिवस हा उरणकराच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. आमच्या हातून कॅबिनेट मंत्र्यांचा सत्कार होत आहे. या दिवशी विविध पक्षांच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

रायगडचा विकास झपाट्याने होणार
आज राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचा सत्कार माझ्या हस्ते होत आहे. ही माझ्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. केंद्रात भाजपचे सरकार असताना राज्यात भाजप, शिवसेनेचे सरकार स्थापन झाले. या सरकारमधून निश्चित उरण, रायगडचा विकास झपाट्याने झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94802 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..