बाप्पाच्या स्वागताला खड्ड्यांचे विघ्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाप्पाच्या स्वागताला खड्ड्यांचे विघ्न
बाप्पाच्या स्वागताला खड्ड्यांचे विघ्न

बाप्पाच्या स्वागताला खड्ड्यांचे विघ्न

sakal_logo
By

वाडा, ता. २८ (बातमीदार) : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना तालुक्यातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे बाप्पाच्या स्वागतात खड्ड्यांचे विघ्न कायम आहे.
तालुक्यातील मुख्य असलेल्या भिवंडी-वाडा-मनोर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. याशिवाय डाकिवली-केळठण-निबंवली, निबंवली-पालसई, घोणसई-मेट, मोहट्याचा ते उसर, मोहट्याचा पाडा ते पळसपाडा, खैरे-कोंढले, खैरे- सावरोली रस्ता, देवगाव- खुपरी रस्ता, चिंचघर-डोंगस्ते रस्ता, बोरांडा- घोडमाळ रस्ता, अतिदुर्गम भागातील अंभरभुई रस्ता आदी अनेक अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे.
तालुक्यात अनेक कारखाने असून या कारखान्यांत कच्चा व पक्का माल घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. यामुळे रस्त्यावरून क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने जात असल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना खड्डेमय रस्त्यांतूनच प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने त्याची दखल घेत कुडूस कोंढला रस्ता, कुडूस चिंचघर गौरापूर रस्ता, कुडूस खानिवली रस्ता हे रस्ते सिमेंट क्रॉंकीटचे बनविण्यात आले असून डाकिवली-केळठण व शिरीष पाडा-खानिवली हे रस्ते सिमेंट क्रॉंकीटीकरणाचे बनविण्याचे काम सुरू आहे. तरीही रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

न्यायालयात धाव घेणार
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जनआंदोलन करून निवेदने देऊन कुठलीच दखल घेतली जात नाही. ही मानवी हक्कांची पायमल्ली असल्याने प्रशासनाविरोधात जनहित याचिका दाखल करून न्यायाची लढाई लढू, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी दिली.

घोणसई मेट या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. या रस्त्यातून मार्ग कसा काढावा, असा प्रश्न पादचारी व वाहनचालकांना पडतो. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ग्रामस्थ या समस्येचा सामना करत आहोत.
- विकास घरत, माजी ग्रामपंचायत सदस्य, घोणसई


फोटो
खड्ड्यांमुळे दुरवस्था झालेला घोणसई मेट रस्ता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94814 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..