कल्याणमधील ५३ महाविद्यालयांत वृक्षारोपण कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमधील ५३ महाविद्यालयांत वृक्षारोपण कार्यक्रम
कल्याणमधील ५३ महाविद्यालयांत वृक्षारोपण कार्यक्रम

कल्याणमधील ५३ महाविद्यालयांत वृक्षारोपण कार्यक्रम

sakal_logo
By

कल्याण, ता. २९ (बातमीदार) : भारतीय जनता पार्टीचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त परिसरातील ५३ महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी झाडांची मदत होते. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. येत्या काळात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण झाले पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम राबविला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक योगदान देण्याची वृत्ती जागृत व्हावी. केवळ वृक्षारोपण करून नाही, तर त्या रोपांचे संवर्धन करण्याची जबाबदारीसुद्धा महाविद्यालयाने घेतली असल्याचे संयोजकांनी सांगितले. यासाठी कल्याण पश्चिममधील ५३ शाळा, महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94818 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..