मुंबई-गोवा महामार्गाची बांधकाममंत्र्यांकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-गोवा महामार्गाची बांधकाममंत्र्यांकडून पाहणी
मुंबई-गोवा महामार्गाची बांधकाममंत्र्यांकडून पाहणी

मुंबई-गोवा महामार्गाची बांधकाममंत्र्यांकडून पाहणी

sakal_logo
By

पेण, ता. २८ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी महामार्गाची पाहणी केली. या दरम्यान सामाजिक संस्थांनी गांधीगिरीच्या मार्गातून जनआक्रोश आंदोलन करून खड्डे भरून घेतले.
अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यातच दरवर्षी पावसाळ्यात अनेक खड्डे पडल्याने गणेशभक्तांना प्रवास खड्ड्यातून करावा लागतो. या खड्ड्यांमुळे अनेक निष्पाप प्रवाशांचे जीवही गेले आहेत. त्यामुळे या गणेशोत्सवात तरी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सरकारने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तत्काळ भरायचे आदेश दिले आहे. सद्यस्थितीत या महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून करण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94831 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..