आज रंगणार शाहिरी जलसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज रंगणार शाहिरी जलसा
आज रंगणार शाहिरी जलसा

आज रंगणार शाहिरी जलसा

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ ः दादर पश्चिम येथील शिवाजी मंदिर येथे सोमवारी (ता. २९) संध्याकाळी ७ वाजता शाहिरी जलसा, गझल व काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रा. शरद शेजवळ, डॉ. गणेश चंदनशिवे, प्रा. प्रशांत मोरे, संदेश उमप, निशांत शेख, ज्येष्ठ शाहीर सुरेंद्र बर्वे आणि दलित पँथर सुवर्णमहोत्सव समितीचे शाहीर आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन दलित पँथर सुवर्णमहोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे कार्यध्यक्ष भीमराव आंबेडकर आणि ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

२०२२ हे परिवर्तनवादी चळवळीतील लोकगायक, शाहीर वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्याची सांगता तसेच लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे, शाहीर विठ्ठल उमप, कवी नारायण सुर्वे व लोकशाहीर कॉ. अमर शेख यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे संध्यकाळी ७ वाजता हा शाहिरी जलसा, गझल व काव्यवाचनाचा कार्यक्रम होईल. याप्रसंगी लोकशाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे यांच्या सहकारी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ज्येष्ठ शाहिरा, केशर जैनू चांद शेख यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्वांना मोफत प्रवेश असेल असे आयोजकांकडून सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या पाससाठी सुबोध मोरे (९८१९९९६०२९), सुनील कदम (८३६९९८२८६१), सुमेध जाधव (९०२९२६८७७८), अमोल निकाळजे (८१६९७०७०२९) यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94841 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..