हार्बरवरील मेगाब्लॉकमुळे गणेशभक्तांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हार्बरवरील मेगाब्लॉकमुळे गणेशभक्तांचे हाल
हार्बरवरील मेगाब्लॉकमुळे गणेशभक्तांचे हाल

हार्बरवरील मेगाब्लॉकमुळे गणेशभक्तांचे हाल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉकमुळे प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील, तसेच पश्चिम रेल्वेने जम्बो ब्लॉक रद्द केल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. गणेशोत्सवामुळे या दिवशी ब्लॉक घेणे उचित नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
मुंबईसह राज्यात शुक्रवारपासून गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. तयारी करण्यासाठी रविवारचा अखेरचा दिवस होता. या दिवशी मुंबईतील दादर, लालबाग, क्रॉर्फड मार्केट, विलेपार्ले, अंधेरी, खेतवाडी बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळत असते; पण मध्य रेल्वेने हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतल्याने प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागली. हार्बर मार्गावरील सीएसएमटी - चुनाभट्टी/ वांद्रे अप - डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे सीएसएमटी /वडाळा रोड येथून वाशी, बेलापूर आणि पनवेलला जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगावकरिता जाणाऱ्या लोकल सेवा रद्द करण्यात आल्या होता; तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ब्लॉकमुळे वाशी, नेरूळ, पनवेलसाठी आणि वाशी, नेरूळ, पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या सेवा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना बाजारपेठा गाठताना त्रास झाला.
...
स्थानकांवर गर्दी
हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवण्यात आल्या. त्यामुळे कुर्ला, दादर, सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात दिवसभर गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी कोणताही मेगाब्लॉक नसल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94856 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..