रेल्वे रुळावर उतरून आंदोलन करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे रुळावर उतरून आंदोलन करणार
रेल्वे रुळावर उतरून आंदोलन करणार

रेल्वे रुळावर उतरून आंदोलन करणार

sakal_logo
By

कळवा, ता. २८ (बातमीदार) ः एसी लोकलमध्ये दिवसभरात पाच हजार प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर प्रत्येक स्थानकात रेल्वेरुळावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा रविवारी (ता. २८) कळवा येथे प्रवासी संघटनांनी दिला. तसेच, पाचव्या, सहाव्या मार्गिकेवरून कर्णकर्कश भोंगा वाजवणाऱ्या मेल-एक्स्प्रेसचा आवाज बंद झाला नाही, तर त्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. यासाठी २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत रेल्वे प्रशासनाला देण्यात आली.

साध्या लोकलमधून एका वेळी ५ हजार ७०० प्रवासी प्रवास करतात; तर एसी लोकलमधून केवळ ५७० जण प्रवास करतात; पण एका एसी लोकलमुळे ५ हजार प्रवाशांना दिवसभर ताटकळत राहावे लागते, असे प्रवासी संघटनांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रवास जलद व्हावा, यासाठी पाचवी-सहावी मार्गिका काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. मात्र, सध्या या नवीन मार्गिकेचा वापर मालगाड्यांसाठी होत असून जुन्या मार्गावरून मेल- एक्स्प्रेस १७५ डेसीबलचा भोंगा वाजवत धावत आहेत. त्यामुळे कळवा रेल्वे स्थानकासह रुळाशेजारील रहिवाशांची झोप उडाली आहे. याविरोधात कळवा येथील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. त्यात एसी लोकलमुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. येथील प्रवाशांना कारशेड गाठून लोकल पकडावी लागत आहे. या अडचणींच्या पार्श्वभूमीवर कळवा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जवळपास तीनशे रेल्वे प्रवासी आणि नागरिकांनी हजेरी लावली. या वेळी माजी मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, मुंबई प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधु कोटियन, उपनगरीय रेल्वे संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, कळवा पारसिक रेल्वे प्रवासी संघटनेचे सिद्धेश देसाई, माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महेश साळवी, मंदार केणी आदी उपस्थित होते.
------
रेल्वे प्रशासनाला इशारा
गणेशोत्सवात रात्री १० वाजेपर्यंत डॉल्बी सुरू असल्यास कारवाई होते. त्यामुळे रात्री १० नंतर १७५ डेसिबल आवाजाचा भोंगा वाजवत धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, त्या विरोधातही गुन्हा दाखल करा, अशी मागणी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली; अन्यथा या रहिवाशांसाठी आम्हाला रात्री १० नंतर रेल्वेरुळावर उतरून भजन करत आंदोलन करावे लागेल, असा इशार आव्हाड यांनी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94860 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..