बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी
बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी

बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी

sakal_logo
By

वासिंद, ता.२९ (प्रतिनिधी) : राज्यातील ओबीसींचे प्रश्न जटिल आहेत. राज्य सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश भांगरथ यांनी केली.

सध्या ओबीसींचे आरक्षण, जातनिहाय जनगणना आदी विविध मागण्यांसाठी ओबीसी संघटनांनी जोर धरला आहे. जातनिहाय जनगणना केल्यास ओबीसींची संख्या निश्चित होऊन त्यांना न्याय देणे सुलभ होईल. तसेच ओबीसी आरक्षणाला ५० टक्के मर्यादा, स्वतंत्र मंत्रालय नसणे, क्रिमिलिअरची अट, स्वामिनाथन आयोगाच्या लागू न केलेल्या शिफारशी, या बाबींमुळे राज्य व देशातील ओबीसींच्या विकासात खीळ बसते, अशी खंत भांगरथ यांनी व्यक्त केली आहे. एका बाजूला आत्मनिर्भर भारत ही घोषणा होत असताना आत्मनिर्भर होण्यासाठी समाजाचे मनोबल वाढणे गरजेचे आहे. मात्र सरकारी धोरणामुळे या समाजाचे मानसिक खच्चीकरण होत असल्याची खंत भांगरथ यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94864 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..