ग्रामसभेत प्रशासकच गैरहजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामसभेत प्रशासकच गैरहजर
ग्रामसभेत प्रशासकच गैरहजर

ग्रामसभेत प्रशासकच गैरहजर

sakal_logo
By

कासा, ता. २८ (बातमीदार) : वर्षभरापासून कासा ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक चालवीत आहे. पण शनिवारी पार पडलेल्या ग्रामसभेत प्रशासक हजर नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अनेक नागरी समस्यांचे निवारण होत नसल्याने महिलांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना जाब विचारला.
अनेक महिन्यांपासून ग्रामसभा झाली नसल्याने अनेक विषयांवर या ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. त्यात स्थानिक उपजिल्हा रुग्णालय, शैक्षणिक विषय, वनविकास, महसूल विभागातील समस्या, महावितरण विभागाच्या समस्या, रोजगार हमी योजना, पेसा कायदा, वनहक्क दावे, प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजनांबाबत चर्चा करण्यात आल्या. कासा येथे उपजिल्हा रुग्णालय असून रुग्णालयात तीन रुग्णवाहिका आहेत, पण एकच वाहनचालक आहे. तसेच तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग यांची पदे रिक्त असल्यामुळे या गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी बाहेर गावी जावे लागते. त्यामुळे येथे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांची संख्या वाढवावी, तसेच कासा गाव परिसरातील अनेक रस्ते खराब झाले असून त्याची दुरुस्ती करावी. पेसा कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासी बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या नळ योजनेतून काही नागरिकांनी नळ घेतले असून त्यातून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्याकडे लक्ष द्यावे, असे अनेक प्रश्न या ग्रामसभेत मांडले गेले; पण प्रशासक उत्तरे देण्यास हजर नसल्याने नागरिकांनी ही ग्रामसभा का घेण्यात आली, असा प्रश्न केला. संतप्त महिलांनी या बाबतीत ग्रामविकास अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी वैद्यकीय अधिकारी प्रतिनिधी, महसूल अधिकारी, कृषी अधिकारी प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, माजी सरपंच रघुनाथ गायकवाड, पंचायत समिती सदस्य अरुण कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94871 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..