मेंढवण येथे उलटलेला टँकर बाजूस घेताना वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेंढवण येथे उलटलेला टँकर बाजूस घेताना वाहतूक कोंडी
मेंढवण येथे उलटलेला टँकर बाजूस घेताना वाहतूक कोंडी

मेंढवण येथे उलटलेला टँकर बाजूस घेताना वाहतूक कोंडी

sakal_logo
By

कासा, ता. २८ (बातमीदार) : मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवण खिंडीत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेत एक टँकर उलटा झाला. महामार्ग पोलिसांनी या अपघातग्रस्त टँकरला बाजूला घेण्यासाठी आज दुपारी तीन मोठ्या क्रेन मागवून बाजूला केला. या कामासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ बंद केली होती. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
मेंढवण खिंडीत उलटलेला टॅंकर रस्त्यातून बाजूला करण्याचे काम प्रशासनाने रविवारी दुपारी सुरू केले. या कामात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक रोखून ठेवली होती; पण या कामासाठी तास दीड तास वेळ लागला. यामुळे चार ते पाच किमीच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94874 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..