गणेशोत्सवानिमित्त दादर फुल मार्केटमध्ये फुलांची मोठी उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवानिमित्त दादर फुल मार्केटमध्ये फुलांची मोठी उलाढाल
गणेशोत्सवानिमित्त दादर फुल मार्केटमध्ये फुलांची मोठी उलाढाल

गणेशोत्सवानिमित्त दादर फुल मार्केटमध्ये फुलांची मोठी उलाढाल

sakal_logo
By

फुलांचा सुगंध महागला

दादरमधील केशवसुत उड्डाणपुलाखाली असलेल्या फूल बाजारात रविवारी बाप्पाच्या चरणी वाहण्यासाठी लागणाऱ्या फुलांची मोठी उलाढाल झाली. घाऊक बाजारात झेंडूच्या फुलांना किलोला ८० ते १०० रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात १५० ते २०० रुपये किलोने झेंडू विकला गेला. यंदा झेंडू आणि गोंड्याच्या फुलांनी ‘भाव’ खाल्ला. शहर परिसरातील विविध भागांतून झेंडूच्या फुलांची मोठी आवक दादर आणि परळ मार्केटसह विविध विक्रेत्यांकडे झाली. आज झेंडूची किंमत १५० ते १८० रुपये किलो होती; परंतु प्रत्यक्ष गणेश चतुर्थी आणि गौरी आगमनाच्या वेळी दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. अस्टरचे दर ४०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. वसईच्या चाफ्याची किंमत ५० ते ६० रुपये आहे. गुलाबाच्या पाकळ्या आणि मिश्र फुलांचा गेल्या आठवड्यापर्यंत दहा रुपयांना मिळणारा वाटा २५ रुपयांपर्यंत पोहचला आहे. गेल्या आठवड्यात पाच ते सात रुपयांना मिळणारे गुलाबाचे फूल ३० रुपयांच्या पार गेले आहे. गुलाबी, पिवळ्या, लाल, हिरव्या आणि निळ्या रंगाच्या गुलाबासाठी ५० रुपये घेतले जात आहेत. विविध रंगांची फुले कमी असल्याने ती महाग असल्याचे फूलविक्रेत्यांनी सांगितले.

फुलांचे किलोमागे भाव
- पिवळा गोंडा ः १५० ते २००
- लाल गोंडा ः १५० ते २००
- कोलकाता गोंडा ः १२० ते १५०
- तुळजापुरी झेंडू ः ७० ते १००
- गावरान झेंडू ः ८० ते १००
- ऑरागोल्ड ः १०० ते १२०
- गुलछडी ः २०० ते २५०
- सुटा कागडा ः ७०० ते ९००
- शेवंती ः १५० ते २००
- गुलाब गड्डी ः ५० ते ६०
- गुलछडी काडी ः २० ते ७०
- डच गुलाब ः २५० रुपये (२० फुलांचा बंडल)
- लिली बंडल ४० ते ५० (५० काडी)
- मोगरा ः १५०० ते १७००

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94893 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..