खारघरमध्ये निर्विघ्न गणेशोत्सवाची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमध्ये निर्विघ्न गणेशोत्सवाची तयारी
खारघरमध्ये निर्विघ्न गणेशोत्सवाची तयारी

खारघरमध्ये निर्विघ्न गणेशोत्सवाची तयारी

sakal_logo
By

खारघर, ता.२९ (बातमीदार): गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याचा दृष्टीने खारघरमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच उत्सव काळात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी खारघर पोलिसांनी उपाययोजना केल्या असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी दिले आहेत.
खारघर परिसरातील गावे आणि वसाहतीत सार्वजनिक गणेश मंडळ आणि सोसायटी मिळून जवळपास ६० सार्वजनिक, तर जवळपास सहा हजार घरगुती गणपतींची स्थापना होणार आहे. विसर्जनासाठी बेलपाडागाव, ओवेपेठ, खारघर गाव, घरकुल, सेंट्रल पार्क मेट्रो स्थानक शेजारी तलाव, तसेच खुंटुक बांधण, ओवागाव आणि फरशीपाडा गणेश घाट या शहरातील आठ प्रमुख तलावांत सोय करण्यात आली आहे. पोलिस ठाणे हद्दीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घटना घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी शंभरहून अधिक पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कुमक तैनात करण्यात येणार आहे.
---------------------------------------
खारघरमधील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सवाच्या नियमांविषयी बैठक घेऊन माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी शांततेने गणेशोत्सव साजरा करावा. तसेच परिसरात काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ खारघर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
- संदीपान शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खारघर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94916 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..