कुरारमध्ये बौद्धजन पंचायत समितीची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरारमध्ये बौद्धजन पंचायत समितीची निदर्शने
कुरारमध्ये बौद्धजन पंचायत समितीची निदर्शने

कुरारमध्ये बौद्धजन पंचायत समितीची निदर्शने

sakal_logo
By

मालाड, ता. २९ (बातमीदार) ः कुरार व्हिलेज पोलिस स्टेशनच्या बाजूला बौद्धजन पंचायत समिती गट क्र. २८ व मालाडमधील बौद्ध समाजाच्या वतीने राजस्थानमधील घडलेल्या इंद्रकुमार मेघवालची हत्‍या करणाऱ्या शिक्षकाचा जाहीर निषेध करण्यात आला. त्याचबरोबर गुजरात येथील बिलकीस बानो या गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना सोडल्याप्रकरणी सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी जातीयवादी शक्तींना आळा घालण्याची मागणी करण्यात आली. बौद्धजन पंचायत समिती गट क्र २८ मधील काही शाखा तसेच कुरारमधील विविध संघटनांचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. समन्वय समितीचे सचिव व ४२३ चे अध्यक्ष चंद्रशेखर जाधव, शाखा क्र ८४७ चे अध्यक्ष संदेश मर्चंडे, शाखा क्र ४७५ चे चिटणीस अनिल मोहिते, सम्यक विचार मंचाचे संतोष वाघमारे, यशवंत मोहिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94932 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..