बसथांब्‍यावरील अतिक्रमण हटवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बसथांब्‍यावरील अतिक्रमण हटवले
बसथांब्‍यावरील अतिक्रमण हटवले

बसथांब्‍यावरील अतिक्रमण हटवले

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २९ (बातमीदार) ः मानखुर्दच्या लल्लूभाई वसाहतीतील बस थांब्याचा आधार घेत अनधिकृत फेरीवाले व्यवसाय करत होते. त्यामुळे बसची वाट पाहत उभ्या असणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागत होते. येथील अतिक्रमण हटवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. अखेर सोमवारी पालिकेने हे अतिक्रमण हटवले आहे.
मानखुर्दच्या लल्लूभाई वसाहत ते कुर्ला रेल्वेस्थानक या मार्गावर बेस्ट प्रशासनाची ३७७ क्रमांकाची बस दर १५ मिनिटांच्या अंतराने धावते. या मार्गावर एकूण १६ थांबे आहेत. त्यापैकी लल्लूभाई वसाहतीतील बस थांब्याचा आधार घेत बेकायदा फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला होता. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहण्यात, बसमध्ये चढण्या-उतरण्यास अडचण येत होती. तसेच बस थांबल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली होती. मुंबई व उपनगरातील बहुतेक पदपथ तसेच रस्त्यांच्या कडेला फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले दिसते. त्याविरोधात पालिकेचे पथक कारवाई करत असते. या बस थांब्यावरील अतिक्रमण पालिका तसेच बेस्ट प्रशासनाला दिसत नाही का, असा सवाल प्रवासी उपस्थित करत होते. बस थांब्याच्या आजूबाजूला असलेली अतिक्रमणे पालिकेने तात्काळ हटवून त्यांना समज द्यावी व होणारी गैरसोय थांबवावी, अशी प्रवाशांची मागणी होती. अखेर सोमवारी कारवाई करत हे अतिक्रमण हटवण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94940 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..