कळवा परिसरातील १८०० कुटुंबे गावी रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळवा परिसरातील १८०० कुटुंबे गावी रवाना
कळवा परिसरातील १८०० कुटुंबे गावी रवाना

कळवा परिसरातील १८०० कुटुंबे गावी रवाना

sakal_logo
By

कळवा, ता. २९ (बातमीदार) : कळवा, विटावा व गणपती पाडा परिसरातील रहिवाशांना गणेशोत्सवासाठी कोकणात व पश्‍‍चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या १,८०० कुटुंबांची व्यवस्था विटाव्यातील संकल्‍प मित्र मंडळाचे अध्यक्ष समाजसेवक संतोष तोडकर यांनी स्वतःच्या खर्चातून विनामूल्य केली आहे. त्यामध्ये त्यांनी पहिल्या टप्प्यात ३० लक्झरी बसची व्यवस्था केली आहे. संस्थेचे हे दुसरे वर्ष आहे. या प्रवासाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून रविवारी समाजसेवक संतोष तोडकर यांच्या हस्ते करण्‍यात आला. या वेळी त्यांनी गाड्यांना झेंडा दाखवून सर्वांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी मराठा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष धिरेंद्र शिंदे, पदाधिकारी संजय लोटनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94941 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..