मुलुंडमध्‍ये अनोखी गणेश रांगोळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्‍ये अनोखी गणेश रांगोळी
मुलुंडमध्‍ये अनोखी गणेश रांगोळी

मुलुंडमध्‍ये अनोखी गणेश रांगोळी

sakal_logo
By

मुलुंड, ता. २९ (बातमीदार) ः गणेशाची मूर्ती पीओपी अथवा शाडूच्या मातीपासून तयार केलेली आपण पाहत आलो आहोत. मात्र मुलुंडमधील मोहनकुमार दोडेचा हे मूर्तिकार असे आहेत जे गेली ६२ वर्षे श्री गणरायाची अनोखी आणि आगळीवेगळी रांगोळी साबुदाण्यापासून साकारत आले आहेत. मुलुंडमधील सुप्रसिद्ध कलाकार मोहनकुमार दोडेचा यांची यंदाची ६२ वी गणेश रांगोळी असून एकूण ३५ किलो साबुदाणे त्यांनी यासाठी वापरलेले आहे. या रांगोळीचे वैशिष्ट्य म्हणजे ती पाच बाय सहा फूट आकाराची असून त्यामध्ये सुमारे २५० ते ३०० रंगांच्या विविध छटा आहेत.
दोडेचा हे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकार असून त्यांना या आगळ्यावेगळ्या आणि अनोख्या रांगोळीबद्दल जागतिक स्तरातून पारितोषिकांनी गौरवले गेले आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये समाविष्ट केले गेले आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना मोहनकुमार म्हणाले की, त्यांनी साबुदाण्यापासून श्री गणेशाची रांगोळी १९६१ पासून बनवायला सुरुवात केली. ही रांगोळी साकारण्यास त्यांना सुमारे एक महिन्याचा कालावधी लागतो. आंतराराष्ट्रीय कलाकार एस. एम. पंडित यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेऊन ही अनोखी रांगोळी साकारण्याचे काम अव्याहतपणे सुरू ठेवले आहे.

या वर्षीचे वैशिष्ट्य
या वर्षी त्‍यांनी शंकर, पार्वती, गणेश आणि कार्तिक यांची रांगोळी साकारली आहे. मोहनकुमार यांच्या चमूमध्ये त्यांना मदत करण्यासाठी भूपेश दोशी, दयाराम हिंदीसोटा, अर्चना पालन, भावना भानुशाली आणि डॉ. चेतन कोटक आदी दररोज या कामासाठी १५ तास आपला वेळ देतात. अशा या रांगोळीचे दर्शन ७ ते १८ सप्टेंबरपर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94942 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..