चाळपेठच्या मंडळाची शतक महोत्सवाकडे वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाळपेठच्या मंडळाची शतक महोत्सवाकडे वाटचाल
चाळपेठच्या मंडळाची शतक महोत्सवाकडे वाटचाल

चाळपेठच्या मंडळाची शतक महोत्सवाकडे वाटचाल

sakal_logo
By

विरार, ता. २९ (बातमीदार) : लोकमान्य टिळकांनी समाज एकत्र यावा, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. वसई तालुक्यातील चाळपेठ येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (वर्ष ८४) शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. मंडळाची सुरुवात १९३७ मध्ये कै. भालभा पंडित यांनी केली. हे मंडळ सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत सिने कलाकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील मंडळींनी भेट देऊन या विघ्नहर्त्याचे दर्शन घेतले आहे.
यात क्रीडा क्षेत्रातील अजित वाडेकर, महानायक अमिताभ बच्चन, संजीव कुमार, नूतन, पद्मा खन्ना तसेच मराठी चित्रपटातील व नाटकातील कलाकार प्रशांत दामले, वर्षा उसगावकर, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण, राजा मयेकर, भाऊ कदम, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, तसेच लोकशाहीर व इतरही काही कलाकारांनी मंडळाला भेट देऊन आपली कला सादर केली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संदीप पितळे यांनी दिली. मंडळ सामाजिक कामात नेहमी अग्रेसर आहे. शैक्षणिक व वैद्यकीय तसेच कोविड १९ प्रादुर्भावाच्या वेळी आगाशी येथे मोफत अन्नदानसेवा कोरोनाचे नियम पाळून मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले. विशेषकरून आदिवासी कुटुंबांना या काळात मदतीचा हात देण्याचे काम मंडळाने केले असल्याचे मिलिंद जोगळे, हितेंद्र भोसले आणि भरत सांगळे यांनी माहिती देताना सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94951 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..