गणेश प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे पूजन; साहित्य खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे पूजन; साहित्य खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत लगबग
गणेश प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे पूजन; साहित्य खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत लगबग

गणेश प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे पूजन; साहित्य खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत लगबग

sakal_logo
By

हरितालिका पूजन साहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग

शिवडी, ता. २९ (बातमीदार) ः गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका देवीचे पूजन केले जाते. त्यासाठी सोमवारी (ता. २९) दादर, परळ व लालबागमधील बाजारपेठेत महिलांची पूजेच्या साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू होती. हरितालिकेची मूर्ती, पत्री आणि सजावटीचे साहित्य घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. मूर्ती, पत्री, वाळू आणि पूजा साहित्य असे एकत्रित पॅकेजही दुकानदारांनी त्यांच्यासाठी २०० रुपयांत उपलब्ध करून दिल्याचे पाहायला मिळाले.
हरितालिका पूजनासाठी लागणारी विविध प्रकारची फळे आणि फुले, दूर्वा आणि देवीच्या ओटीचे साहित्य घेण्यासाठी हारांच्या स्टॉलवर दिवसभर ग्राहकांची वर्दळ होती. बाजारपेठेत हरितालिकेच्या आकर्षक मूर्तीही विक्रीसाठी उपलब्ध होत्या. हरितालिका पूजेच्या वेळी वाळूपासून शंकराची पिंड करतात. अलीकडे वाळू लगेच उपलब्ध होत नसल्याने विक्रेत्यांनी त्याचीही पाकिटे विकायला सुरुवात केली आहे. दोन देवी व शंकराची पिंड अशा वेगवेगळ्या मूर्तींची किंमत प्रत्येकी ५० ते १०० रुपये आहे. मूर्तींचा दर्जा व आकारानुसार त्याच्या वेगवेगळ्या किमती आहेत. सोशल मीडियावरून ऑनलाईन विक्री करणाऱ्या लघुउद्योजकांनीही हरितालिका पूजा साहित्य विक्रीसाठी उपलब्ध केले असून ते घरपोचही पोहचवले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94964 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..