कोकणातील गौरी-गणपतीसाठी चारकोपवरुन विशेष एसी बस रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणातील गौरी-गणपतीसाठी चारकोपवरुन विशेष एसी बस रवाना
कोकणातील गौरी-गणपतीसाठी चारकोपवरुन विशेष एसी बस रवाना

कोकणातील गौरी-गणपतीसाठी चारकोपवरुन विशेष एसी बस रवाना

sakal_logo
By

कांदिवली, ता. २९ (बातमीदार) ः आमदार योगेश सागर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गौरी-गणपतीसाठी मालवण व सावंतवाडीसाठी विशेष बस रवाना झाल्या. या वेळी बसचे व्यवस्थापक योगेश पडवळ यांनी सांगितले की, दरवर्षी विशेष एसी बसमधून जाण्याचा आनंद वेगळाच असतो. येथे बसमध्ये बसल्यावर आपल्या गावातील मुख्य ठिकाणी उतरता येते, यामुळे चारकोपकरांची विशेष पसंती या गाड्यांना असते.
योगेश सागर दरवर्षी कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी विशेष खाजगी बसची व्यवस्था करतात. एक महिना अगोदर नाव नोंदणी करण्यात येते. प्रत्येक प्रवाशाच्या गावापर्यंत बस सेवा असल्याने गणपतीचे सामान नेणाऱ्या प्रवाशांसाठी ही पर्वणीच ठरत आहे. या वेळी प्रत्येकाला आरती संग्रह पुस्तिका देण्यात आली. योगेश सागर यांनी प्रवाशांसह श्रीफळ वाढवून पूजा केली. माजी नगरसेवक दीपक तावडे यांनी झेंडा दाखविला. या वेळी ज्‍येष्ठ नगरसेवक कमलेश यादव, बस व्यवस्थापन प्रमुख योगेश पडवळ, प्रमोद गुजर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94968 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..