जिल्ह्यात ५९,५७२ मूर्तीची होणार प्रतिष्ठापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात ५९,५७२  मूर्तीची होणार प्रतिष्ठापना
जिल्ह्यात ५९,५७२ मूर्तीची होणार प्रतिष्ठापना

जिल्ह्यात ५९,५७२ मूर्तीची होणार प्रतिष्ठापना

sakal_logo
By

वसई, ता. २९ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात गणरायाच्या आगमनासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासनाकडून देखील खबरदारीच्या उपायोजना करण्यात आल्या असून पालघर ग्रामीण व मीरा भाईंदर वसई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात एकूण ५९,५७२ मूर्तीची गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
कोरोनाचे निर्बंध हटविल्यावर पहिल्यांदा गणेशोत्सवाचा मोठा उत्साह असून, पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा, तलासरी, बोईसर, कासा, वसई, विरार, मीरा भाईंदर, जव्हार, मोखाडा भागात उत्साहाचे वातावरण दिसून उलट आहे. सार्वजनिक मंडळांकडून मंडपात मिरवणूक काढत मूर्ती आणल्या जात आहेत. घरगुती वातावरण देखील प्रफुल्लित असून लाडका बाप्पा कधी घरी विराजमान होतो याची आतुरता भाविकांना लागली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ५० हजाराहून अधिक मूर्तींची पूजा करण्यात येणार आहे. विरार येथे सर्वाधिक विरार येथे गणपती मूर्ती असून त्यांची संख्या ५,६४१ इतकी आहे. तर मीरा-भाईंदर वसई-विरार शहरात सार्वजनिक मंडळात ५१ व घरगुती १,७९० गौरीचे आगमन होणार आहे. बाप्पांना आकर्षक आरास, विद्युत रोषणाई, पूजेचे साहित्य व अन्य सजावट करण्यासाठी बाजारपेठेतून खरेदी देखील ९० टक्के पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या बुधवारी बाप्पांची मनोभावे पूजा करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.
--------------------------------------
आयुक्त सदानंद दाते उतरले रस्त्यावर
वसई-विरार मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त सदानंद दाते सार्वजनिक मंडळांना भेटी देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. गणेशत्सव साजरा करताना नियमांची आठवण करून दिली जात आहे. आयुक्त स्वतः मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याने सुरक्षिततेची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे.
------------------------------------
महापालिका प्रशासन सज्ज
वसई विरार महापालिकेने यंदा कृत्रिम तलाव विसर्जन मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाहणी करण्यात येत आहे. तसेच अधिकाधिक सामाजिक उपक्रमावर भर देण्याचे आवाहन देखील सार्वजनिक मंडळांना करण्यात येत आहे.
-----------------------------------
मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाकडून २ हजार पोलीस तैनात असणार आहेत, यात अधिकारी कर्मचारी तसेच, एसआरपीचे जवान, होमगार्ड आदींचा देखील समावेश असणार आहे.
-------------------------------------
घरगुती - ४९०१० - ८४८८
सार्वजनिक - १२१८ - १८५५

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94969 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..