मुलांनी घडविले श्री गणेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांनी घडविले श्री गणेश
मुलांनी घडविले श्री गणेश

मुलांनी घडविले श्री गणेश

sakal_logo
By

कांदिवली, ता. २९ (बातमीदार) ः रविवारी सुट्टीच्या दिवशी चिमुकल्या हातांनी गणपती बाप्पा तयार केले. प्रत्येक हात माझा गणपती चांगला कसा होईल यामध्ये व्यस्त झाले होते. रोटरी क्लब आणि इनरव्हील कल्ब ऑफ बोरिवलीच्या वतीने एकता नगर येथील पार्वतीबाई सदन येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. जवळपास ४५ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्वतः गणपती घडविले. एक दिवसीय शिल्पकला कार्यशाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन मातीपासून गणपती घडविले. पहिल्यांदाच अशी संधी मिळाल्याने मुलांमध्ये उत्साह ओसंडून वाहात होता. रोटारी क्लबने विशिष्ट माती विद्यार्थ्यांना देऊन गणपती मूर्ती कशी घडवायची याबाबत मार्गदर्शन केले. दोन तासांमध्ये मुलांनी मूर्ती घडविल्या. या वेळी काहींचे पालकदेखील सहभागी झाले होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष के. वी. प्रेमराज, इनरव्हील ऑफ बोरिवलीच्या अध्यक्षा जिग्णा मिस्त्री, रोटरी पर्यावरण प्रोजेक्ट डायरेक्टर अश्विनी गाला आणि सरिता गुजराती यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94970 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..