गणेश मंडळांना आर्थिक भूर्दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश मंडळांना आर्थिक भूर्दंड
गणेश मंडळांना आर्थिक भूर्दंड

गणेश मंडळांना आर्थिक भूर्दंड

sakal_logo
By

खारघर, ता.२९ (बातमीदार) : सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्सव साजरा करण्यासाठी सिडको वसाहतीत पालिकेने प्रतिदिन पंधरा रुपये फूट दराने जागेचे भाडे आकारले आहे. त्यामुळे गणेश मंडळांना चाळीस ते पन्नास हजारांची रक्कम मोजण्याची वेळ आली असून पालिकेच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यात अनेक पालिकांनी सार्वजनिक गणेश भक्तांना उत्सव साजरा करण्यासाठी सवलत दिली आहे; तर काही ठिकाणी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी सिडको वसाहतीतील मैदाने अथवा मोकळ्या जागेत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी घेताना पाच ते सात हजारांचे शुल्क आकारून जागा दिली जात होती. मात्र, आता या वसाहती पनवेल पालिकेकडे हस्तांतर झाल्यामुळे मंडळांनी परवानगीसाठी पालिकेकडे धाव घेतली आहे. पण या जागांसाठी पालिका प्रतिदिन पंधरा रुपये फूट दर आकारणी करत आहे. त्यामुळे दहा दिवसांसाठी गणेश मंडळांना चाळीस ते पन्नास हजार रुपये मोजावे लागण्याची वेळ आल्याने गणेश मंडळांमध्ये नाराजी आहे.

मंडळाचे गणित बिघडले
काही गणेशभक्तांकडे विचारणा केली असता, सार्वजनिक गणेशोत्सव हा त्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकडून देणगी वसूल करून उत्सव साजरा केला जातो. त्यात कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. दोन वर्षे दुकानदार, व्यापारी वर्गाचा व्यवसाय बंद होता. त्यामुळे पूर्वीप्रमाणे देणगी प्राप्त होत नाही. त्यात गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सजावटीच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. मंडपाचे दर वाढल्याने जागेचे चौपट भाडे आकारणीमुळे मंडळाचे गणित बिघडले आहे.

कोट -
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सिडकोकडून जागेचे भाडे पाच ते सहा हजार रुपये आकारून परवानगी दिली जात असे, मात्र या वर्षी पालिकेने जागेच्या भाड्यापोटी तिप्पट दर आकारून परवानगी दिली आहे. ज्याप्रमाणे दुहेरी मालमत्ता कर आकारणी केली जात आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सवासाठी पालिका मंडळांकडून जिझिया कर वसूल करीत आहे.
- केशरीनाथ पाटील, अध्यक्ष, श्री गणेश मंडळ, शिल्प चौक, खारघर

जागा पालिकेच्या मालकी असेल तर २०१७ साली भाडे आकारणी संदर्भात सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केला आहे. त्यानुसार भाडे आकारणी करण्यात येते.
- जयराम पादीर, वसाहत अधिकारी, सिडको.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94982 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..