अमृतमहोत्सवी मोफत लसीकरणाला अल्प प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृतमहोत्सवी मोफत
लसीकरणाला अल्प प्रतिसाद
अमृतमहोत्सवी मोफत लसीकरणाला अल्प प्रतिसाद

अमृतमहोत्सवी मोफत लसीकरणाला अल्प प्रतिसाद

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारकडून विनामूल्य कोविड प्रतिबंधक बूस्टर डोस दिला जात आहे; मात्र या लस महोत्सवाला राज्यातील नागरिकांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, विनामूल्य बूस्टर डोस घेण्यात राज्यात मुंबईकर आघाडीवर आहेत. एकूण लसीकरणापैकी मुंबईत तीन लाख ५२ हजार ८०५ नागरिकांचा बूस्टर डोस घेतला आहे. त्यापाठोपाठ ठाण्यात ३ लाख ४० हजार ४०७ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमात राज्यात आतापर्यंत ३९,५९,९८० लाभार्थ्यांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. १५ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीपर्यंत ‘कोविड लस अमृतमहोत्सव’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. ७५ दिवसांच्या या कालावधीत १८ वर्षांवरील सर्व पात्र लाभार्थ्यांना सर्व शासकीय लसीकरण केंद्रावर विनामूल्य बूस्टर डोस दिला जात आहे. सध्या मुंबईत महापालिका व शासकीय रुग्णालयात १०४, तर खासगी रुग्णालयात १२५ अशी एकूण २२९ लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत.
आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यात विनामूल्य बूस्टर मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहेत. शिवाय सणासुदीमुळेही लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे; मात्र वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बूस्टर डोस आणि कोविड लशीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ मांडतात.
----
जिल्हानिहाय बूस्टर डोस
जिल्हा लसीकरण
मुंबई ३,५२,८०५
ठाणे ३,४०,४०७
नाशिक ३,१०,७०६
पुणे २,८२,१८१
पालघर १,९२,१८६

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94983 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..