पाण्यासाठी रहिवाशांची म्हाडा कार्यालयावर धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्यासाठी रहिवाशांची म्हाडा कार्यालयावर धडक
पाण्यासाठी रहिवाशांची म्हाडा कार्यालयावर धडक

पाण्यासाठी रहिवाशांची म्हाडा कार्यालयावर धडक

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २९ (बातमीदार) ः विक्रोळी कन्नमवार नगर परिसरातील असलेल्या म्हाडाच्या ७ ए, ७ बी, ७ सी, ७ डी या इमारतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा कमी दाबाने, तर काही इमारतींमध्ये पाणीच वेळेत येत नसल्याने रहिवाशी चिंतेत होते. राज्यात सर्वत्र उत्सवांची धामधूम सुरू आहे. गणेशोत्सव एक दिवसावर आला आहे. उत्सवाच्या दिवसातच विक्रोळीकरांवर पाणी संकट ओढवले आहे. आज संयमाचा बांध फोडत अखेर विक्रोळीकरांनी स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली म्हाडा कार्यालयावर धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी नगरसेवक उपेंद्र सावंत उपस्थित होते.
रहिवाशांना ऐन सणासुदीत पाण्याची समस्या भेडसावू नये, तसेच त्यांना होत असलेल्या समस्येचे तत्काळ निवारण झाले पाहिजे, असे अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी राऊत यांनी रहिवाशांची भेट घेऊन इमारतीतील पाण्याच्या टाकीची पाहणी केली. नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्ही अधिकाऱ्यांना पाण्याचा दाब वाढवून पाणी सोडण्याबाबत सांगितले आहे. सध्या पाणी दाब वेगाने सुरू केला आहे. मात्र ही समस्या पुन्हा निर्माण झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94993 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..