पर्यावरणपूरक गणेशोत्सवांना मिरा-भाईंदर महापालिकेकडून पारितोषिके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवांना मिरा-भाईंदर महापालिकेकडून पारितोषिके
पर्यावरणपूरक गणेशोत्सवांना मिरा-भाईंदर महापालिकेकडून पारितोषिके

पर्यावरणपूरक गणेशोत्सवांना मिरा-भाईंदर महापालिकेकडून पारितोषिके

sakal_logo
By

भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : पर्यावरण रक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी यंदा मिरा-भाईंदर महापालिकेने याच विषयावर आधारित गणेशोत्सव मंडळांच्या सजावटींना पारितोषिके घोषित केली आहेत. महापालिकेने नेमलेल्या परीक्षक मंडळाकडून या गणेशोत्सव मंडळांची निवड केली जाणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण, सप्तपदी स्वच्छतेची व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या अंतर्गत महानगरपालिकेने गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. पर्यावरण हाच या स्पर्धेचा केंद्रबिंदू असणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यावरण, पर्यावरण पूरक मूर्ती, उत्कृष्ट मूर्ती, तसेच सामाजिक विषय या चार गटात प्रत्येकी ११ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय उत्कृष्ट मंडळासाठी पहिले पारितोषिक ३१ हजार, द्वितीय पारितोषिक २१ हजार व तृतिय पारितोषिक ११ हजार अशी बक्षीसेही दिली जाणार आहे. महापालिकेने यासाठी छापील अर्ज उपलब्ध केले असून समजाकल्याण विभागात ते मिळणार आहेत. येत्या २ सप्टेंबरपर्यंत हे अर्ज भरुन ते महापालिका कार्यालयात जमा करायचे आहेत.
तसेच राजकीय व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांकडूनही घरगुती गणेश दर्शन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी आपल्या नारी सशक्तीकरण फाऊंडेशनच्यावतीने घरगुती गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली असून गणेश मूर्ती, सजावट व सामाजिक संदेश अशा गटात सोन्याचे नाणे बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अन्नु पाटील यांनी आपल्या रुद्र फाऊंडेशनच्या माध्यमातून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे यात बक्षिस म्हणून सोन्याची नथ, पैठणी साडी तसेच चांदीचे करंडे आदी बक्षीसे ठेवली आहेत.
.....
असे आहेत निकष
ही पारितोषिके देताना शाडूच्या मातीची मूर्ती, थर्माकोल अथवा प्लास्टिकचा वापर न करता केलेली सजावट, ध्वनीप्रदूषण विरहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा आदी समाज प्रबोधनपर विषयावर आधारित देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भातील देखावा, रक्तदान शिबीर, वैद्यकीय शिबीर आदी सामाजिक कार्य, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी केलेल सामाजिक कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या संदर्भात केलेले सामाजिक कार्य, पारंपारिक किंवा देशी खेळाच्या स्पर्धा, गणेशभक्तांना देण्यात येत असलेल्या प्राथमिक सुविधा, वैद्यकीय उपचार, परिसरातील स्वच्छता, नियमांचे पालन, मंडप परवानगी, शिस्त आदी सर्व मुद्यांसाठी मंडळांना गुण देण्यात येणार आहेत. त्याच्या आधारे पारितोषिकासाठी निवड केली जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94995 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..