वसईत चिमुकल्या हाताने साकारले बाप्पा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत चिमुकल्या हाताने साकारले बाप्पा
वसईत चिमुकल्या हाताने साकारले बाप्पा

वसईत चिमुकल्या हाताने साकारले बाप्पा

sakal_logo
By

वसई, ता. २९ (बातमीदार) : अनेक कारखान्यात मूर्तिकार मूर्ती घडवतात. मात्र विद्यार्थ्यांनी आपल्या चिमुकल्या हाताने देखील बाप्पांच्या आकर्षक मूर्ती तयार केल्या. न्यू इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपतीच्या मूर्ती साकारत ‘बाप्पा आमचा, गणपती बाप्पा मोरया’ असा जल्लोष केला.
दोन वर्षांपासून घरी असलेले व ऑनलाईन अभ्यास करणारे विद्यार्थी बंधनात होते. त्यांना मैदानी खेळ, कलेपासून सूर राहावे लागले होते. अशातच यंदा स्वच्छंदी वातावरणात वर्गात बसून विद्यार्थी गणेशमूर्ती तयार करण्यात मग्न झाल्याचे पाहवयास मिळाले. गणेशाची मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य शाळेने पुरवले त्यानंतर गणपतीचा आकार देण्यास विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. गव्हाचे पीठ, साबण, शाडूच्या मातीपासून व अन्य पद्धतीने बाप्पा साकारण्यात आला. एकूण २०० विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग घेतला होता. मूर्तीपुढे आकर्षक रांगोळी काढण्यात आली व नैवैद्य देखील ठेवण्यात आला होता. शाळेच्या प्राचार्या एस,एल वाझ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
---------------------------
वसई : न्यू इंग्लिश शाळेत गणेशाची मूर्ती साकारताना विद्यार्थी.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94999 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..