पादचारी पुलाची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पादचारी पुलाची प्रतीक्षा
पादचारी पुलाची प्रतीक्षा

पादचारी पुलाची प्रतीक्षा

sakal_logo
By

धारावी, ता. ३० (बातमीदार) : मुंबईतील महत्त्‍वाच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील जैन सोसायटीसमोरील रस्त्यावरून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे मुश्कील होत आहे. येथे पादचारी पूल उभारण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे; मात्र आजतागायत हा पादचारी पूल पूर्ण झाला नसल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडून जावे लागत आहे. यामुळे अनेकदा अपघात होत आहेत. पादचारी पूल लवकरात लवकर पूर्ण केला जावा, अशी मागणी होत आहे.
धारावीतून धोबी घाट येथील मध्य रेल्वेवरील पादचारी पूल ओलांडून सायन कोळीवाडा, अँटॉप हिल या दिशेला जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने धारावीतील रहिवासी याचा वापर करतात. जैन सोसायटी येथे रस्ता ओलांडताना अनेकदा अपघात होत असल्याने वाहतूक विभागाने येथे सिग्नल यंत्रणा उभारली आहे. मात्र, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास फक्त ३० सेकंदाचा वेळ ठेवण्यात आल्याने पादचाऱ्यांची धावपळ होते. अनेकदा महिला, लहान मुले, शालेय विद्यार्थी, ज्‍येष्ठ नागरिक यांची तारांबळ उडते. सिग्नल चालू झाला की, वाहन भरघाव वेगाने रस्त्यावरून धावू लागतात. यामध्ये एखाद्या पादचाऱ्याचा रस्ता ओलांडताना अंदाज चुकला; तर त्याचा अपघात होतो. धारावीतून गौरीदत्त मित्तल हायस्कूल, सायन सेकंडरी मनपा शाळा आदी शाळांमध्ये धारावी परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात. या विद्यार्थ्यांना व पालकांना तारेवरची कसरत करत रस्ता ओलांडावा लागतो. धावपळीत अपघात होत असल्याने पादचारी संताप व्यक्त करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95006 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..