गणेशमूर्तींना देखील महागाईचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशमूर्तींना देखील महागाईचा फटका
गणेशमूर्तींना देखील महागाईचा फटका

गणेशमूर्तींना देखील महागाईचा फटका

sakal_logo
By

भिवंडी, ता. २९ (बातमीदार) : गणेशमूर्तींना लागणाऱ्या सर्व वस्तू महागल्याने त्याचा परिणाम मूर्ती घडणावळीवर होऊन मूर्तींच्या किमती सुमारे ३० टक्क्यांनी महागल्या आहेत.
मुख्यतः जीएसटी आणि पेट्रोल दरवाढीमुळे मूर्तींसाठी लागणाऱ्या मालाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या भाववाढीमुळे या लघुउद्योगाचे भांडवल वाढू लागल्याने मूर्तिकार देखील त्रस्‍त आहेत. या व्यवसायात भांडवल जास्त लागत असून त्या तुलनेत अपेक्षित फायदा मिळत नाही. आता मूर्ती कलेची किंमतदेखील प्लास्टरच्या मूर्तीमुळे कमी होऊ लागली असून, मूर्ती बनविण्यासाठी लागणारी शाडूची माती, प्लास्टर, रंग, सोनेरी व चांदीची शाई यांचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून मातीच्या रंगाबरोबर मूर्तीच्या गादीला मखमली कापड, कापडाला किनार आणि मुकुटामध्ये हिरे लावण्याचा खर्च वाढला असून अनेकदा हा खर्च मूर्तिकरांना सोसावा लागत आहे.
------------------
कोट
आमच्या कारखान्यात दरवर्षी एक ते ९ फुटांच्या ८५०-ते ९०० मूर्ती बनविल्या जात असून हे काम वर्षभर सुरू असते. मूर्तीच्या कामासाठी आठ ते दहा कामगार झटत असतात. सर्वच दर वाढल्याने मूर्तींमध्ये यावर्षी ३० टक्के दर वाढ करण्‍यात आली आहे. सरकारने या लघु उद्योगासाठी बिनव्याजी भांडवल पुरविले पाहिजे.
- विवेक घोष्टेकर, मालक, विशाल कला मंदिर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95016 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..