क्रेडिट कार्डच्या कॅशबॅकमधून फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रेडिट कार्डच्या कॅशबॅकमधून फसवणूक
क्रेडिट कार्डच्या कॅशबॅकमधून फसवणूक

क्रेडिट कार्डच्या कॅशबॅकमधून फसवणूक

sakal_logo
By

क्रेडिट कार्डच्या कॅशबॅकमधून फसवणूक
आरोपी बँक कर्मचारी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : क्रेडिट कार्डमधून मिळणाऱ्या कॅशबॅक संदर्भात फसवणूक केल्याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी एका बँक कर्मचाऱ्याला अटक केली आहे. नितीन खरे (वय ४४) असे आरोपी बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे. कॅशबॅकच्या नावाने बँकेची फसवणूक केल्याचा आरोपीवर आरोप आहे. बँकेच्या चांदिवली शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून साकीनाका पोलिस ठाण्यात भा.दं.वि कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुंबईतील आयसीआयसीआय बँकेच्या चांदीवली शाखेत अधिकारी असलेले तक्रारदार बिबेकानंद परमानंद नायक यांनी बँकेत नोकरीस असलेल्या कर्मचारी नितीन सुरेश खरे याच्याबद्दल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांच्या क्रेडिट कार्ड वापरानंतर मिळणाऱ्या कॅशबॅक संदर्भात बँकेकडे आलेल्या माहितीचा रेकॉर्ड ठेवण्याचे नितीन याचे काम होते. नितीन खरे याने सदर शीट बनवण्याचे काम करत असताना बँकेच्या कार्डधारकांच्या कार्ड वापरानंतर बँकेकडे प्राप्त माहितीच्या शीटमध्ये स्वतःच्या ओळखीच्या व्यक्तींचे कार्ड नंबर बनावट नोंद घेऊन कॅशबॅक मंजुरीसाठी पाठवत असे. त्यानंतर मूळ क्रेडिट कार्डधारकांसोबत नमूद ओळखीच्या कार्ड धारकाला कॅशबॅक पाठवली जाते. यामध्ये एकूण ८३ क्रेडिट कार्डावर वेगवेगळ्या ट्रांझेक्शद्वारे एकूण ४ कोटी रुपयांची बँकेची फसवणूक करण्यात आल्याचा दावा पोलिस तक्रारीत करण्यात आला आहे.
तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेल्या क्रेडिट कार्डधारकांच्या खात्यांवरून एकूण १.१४ कोटी रुपये थेट बँकेकडे हस्तगत करण्यात आलेले आहेत. सदर कॅशबॅक दिल्यानंतर नाशिक येथील दुकानात कार्डाचा वापर करून आरोपी नितीन खरे याने स्वतःच्या व ओळखीच्या इसमांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर जमा झालेली रक्कम गोळा केली. सध्या आरोपी पोलिसांच्या कोठडीत असून या प्रकरणात साकीनाका पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95030 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..