गणरायाच्या स्वागतासाठी मुंबई झाली सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणरायाच्या स्वागतासाठी मुंबई झाली सज्ज
गणरायाच्या स्वागतासाठी मुंबई झाली सज्ज

गणरायाच्या स्वागतासाठी मुंबई झाली सज्ज

sakal_logo
By

आतुरता आगमनाची!
गणरायाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज

प्रभादेवी, ता. २९ (बातमीदार) : गणेश चतुर्थीला अवघा एकच दिवस उरला असल्याने घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांतही कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणि उत्साह असून भक्तिपूर्ण वातावरणात ढोल-तशांच्या गजरात लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर यंदा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करायला मिळणार असल्याने भक्तांची आतुरता शिगेला पोहचली आहे.
गेल्या महिनाभरापासून गणरायाच्या सजावटीपासून आगमनापर्यंतची व्यवस्था करण्यासाठी गणेशभक्तांची धडपड सुरू होती. गणेशोत्सवाला एकच दिवस उरल्याने जिकडेतिकडे शेवटच्या टप्प्यातील तयारीची लगबग दिसून येत आहे. बाप्पाला लागणाऱ्या प्रसादाकरिता बेसन लाडू, नारळाच्या वड्या, मोदक आणि विविध प्रकारचे गोड पदार्थ बनवण्यात महिला दंग झाल्या आहेत. सार्वजनिक मंडळांच्या मंडपात करण्यात आलेली विद्युत रोषणाई आणि सजावटीत गुंतलेल्या घरामुळे परिसर भक्तिमय होऊन गेल्याचे चित्र सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांनी शाडू मातीच्या गणेशमूर्तीला प्राधान्य दिले असून अनेक मंडळांनी सामाजिक संदेश देणारा देखावा साकारला आहे.
दोन वर्षे साधेपणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यंदा मात्र मोठी सजावट करण्यात आली आहे. दोन वर्षांत कोणाला गणेशदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते. यंदा, मात्र सर्वांबरोबर गणेशोत्सव साजरा करणार आहोत, असे गणेशभक्त दीपक सुर्वे यांनी सांगितले.

सामाजिक प्रबोधनाचा संकल्प
मध्य प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा सामाजिक प्रबोधनाचा संकल्प केला आहे. विविध समाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
‘प्रभादेवीच्या राजा’ची सजावट प्रत्येक वर्षी लक्षवेधी असते. यंदाही उत्तम सजावट होण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग दिसून येत आहे. लालबाग, परळ, चिंचपोकळी, वरळी, दादर इत्यादी परिसरात जल्लोषाचे वातावरण असून बाप्पाच्या स्वागतासाठी ढोल-ताशे पथक सज्ज आहेत. काही मंडळांनी विविध टी-शर्टही छापले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95039 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..