अंबाडी ब्रिजवर तीन वाहनांचा अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाडी ब्रिजवर तीन वाहनांचा अपघात
अंबाडी ब्रिजवर तीन वाहनांचा अपघात

अंबाडी ब्रिजवर तीन वाहनांचा अपघात

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २९ (बातमीदार) : वसईच्या अंबाडी ब्रिजवर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. यात जीवितहानी झाली नाही, मात्र एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. एका काँक्रिट मिक्सर ट्रकने कारला धडक दिली. कारने पुढील दोन रिक्षांना धडक दिली त्यात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सोमवारी (ता. २९) दुपारी ४ वाजता ही घटना घडली असून माणिकपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर दाखल होऊन अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून ट्रकचालकास ताब्यात घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95049 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..