मेट्रो-३ ची आज होणार चाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो-३ ची आज होणार चाचणी
मेट्रो-३ ची आज होणार चाचणी

मेट्रो-३ ची आज होणार चाचणी

sakal_logo
By

मेट्रो-३ ची आज होणार चाचणी
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ मार्गाच्या पहिल्या रेल्वेची चाचणी मंगळवारी (ता. ३०) घेण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) घेतला आहे. या पहिल्या मेट्रो रेल्वेच्या चाचणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती असणार आहेत.
मेट्रो-३ चे कारशेड आरेमध्ये बनवण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर या प्रकल्पाला वेग आला आहे. आरेमध्ये कारशेड बनवण्यास पर्यावरण संघटनांकडून विरोध होत असतानाच मंगळवारी एमएमआरसीएलकडून मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथे तयार करण्यात आलेल्या रेल्वेने १ हजार ४०० किमीचा पल्ला गाठत दोन टप्प्यांत मेट्रोचे आठ डबे मुंबईत दाखल झाले आहेत. या आठ डब्यांची जुळवणी करून आरेच्या सारिपूत नगरातील तात्पुरत्या सुविधेमध्ये एक रेल्वे तयार करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सारीपुतनगर येथील ट्रॅकवर पहिल्या मेट्रो रेल्वेची चाचणी होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95057 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..