‘चिंतामणी’च्या सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘चिंतामणी’च्या सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ
‘चिंतामणी’च्या सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ

‘चिंतामणी’च्या सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ : चिंचपोकळी येथील चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती आगमन सोहळ्यात मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. भक्तांच्या सोन्याची चेन, मोबाईल, पाकिटे यावर डल्ला मारला. काळाचौकी पोलिस ठाण्यात ७६ भक्तांच्या तक्रारी पोलिसांनी नोंदवल्या आहेत. यात प्रामुख्याने ५० महागडे मोबाईल फोन चोरीला गेल्याची माहिती आहे.
मुंबईतील गिरणगावात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा कोरोनाचे संकट काही प्रमाणात दूर झाल्याने उत्सवावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव मंडळात उत्साहाचे वातावरण आहे. मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात रांग लागली होती. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सणांच्या काळात काही टोळ्या कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गर्दीच्या ठिकाणी मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95069 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..