शिवसेनेचे घेराव आंदोलन स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे घेराव आंदोलन स्थगित
शिवसेनेचे घेराव आंदोलन स्थगित

शिवसेनेचे घेराव आंदोलन स्थगित

sakal_logo
By

खर्डी, ता. ३० (बातमीदार) : शहापूर तालुक्यात रोज विजेचा लपंडाव सुरू आहे. गणेशोत्सव, नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहापूरच्या वतीने ३० ऑगस्टला शहापूर येथील महावितरण कार्यालय घेराव आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा उपसंपर्कप्रमुख संतोष शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला होता. मात्र तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्यानंतर शिवसेनेचे घेराव आंदोलन स्थगित करण्यात आले.

गणेशोत्सव काळात शहापूर तालुक्यात वीजपुरवठा बंद होणार नाही व महावितरणसंबंधित सर्व अडचणी टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी वरिष्ठांशी बोलून प्रयत्न करणार असल्याचे शहापूरच्या महावितरणचे सहायक अभियंता अविनाश कट्टकवार यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेचे जिल्हा उपसंपर्कप्रमुख संतोष शिंदे व पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्या उपस्थित घेतलेल्या बैठकीत त्यांनी जाहीर केले. तालुक्यातील खर्डी, वासिंद, अघई, शेणवा, आसनगाव, किन्हवली, कसारा व अतिदुर्गम भागातील खेड्यात वीजपुरवठा सुरळीत नसतो. नागरिकांना विजेचा प्रवाह कमी-जास्त होणे, ट्रान्स्फार्मर जास्त क्षमतेचे न लावणे, तुटलेले-वाकलेले खांब न बदलणे, लटकलेल्या तारा बदलणे व पाणीपुरवठा योजनेचे ट्रान्स्फार्मर वेळच्या वेळी न बदलल्याने पाणीटंचाई जाणवणे यांसारख्या अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95072 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..