निर्विघ्न गणेशोत्सवासाठी सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी सज्ज
निर्विघ्न गणेशोत्सवासाठी सज्ज

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी सज्ज

sakal_logo
By

वाशी, ता. ३० (बातमीदार) ः कोरोनामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा गणेशोत्सव साजरा होत असल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. विविध सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे या सणासुदीच्या काळात कोणतेही विघ्न येऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलिस आणि महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे.
नवी मुंबईमध्ये विसर्जनासाठी १३४ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती पालिकेने केली आहे. २२ ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे, याशिवाय जीवरक्षकही तैनात केले गेले आहेत. सणासुदीच्या काळातील बंदोबस्तासाठी एक पोलिस उपायुक्त, दोन सहायक पोलिस आयुक्त, १२५ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि ८०० पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा बंदोबस्तासाठी रुजू करण्यात आले आहेत.‌ तसेच आवश्यक त्या सर्व ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटिंग केले आहे. श्री गणेशोत्सव काळामध्ये ध्वनिप्रदूषण करण्यास मनाई असून डीजे आणि डॉल्बीवर बंदी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
----------------------------
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये १६४ पेक्षा अधिक ठिकाणी दिघ्यापासून बेलापूरपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आहे. याशिवाय ३०,००० पेक्षा अधिक घरांमध्ये घरगुती गणेशोत्सव मनोभावे साजरा होतो. महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. १४ हजार ९० गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात आले होते.
--------------------------------
नवी मुंबईमध्ये गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. ८०० पेक्षा अधिक पोलिस दल बंदोबस्तासाठी तैनात केले आहे. नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई पोलिस संयुक्तपणे काम करीत असून विविध विसर्जन स्थळांची पोलिस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणीदेखील केली आहे.
- विवेक पानसरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95082 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..