टीबी रुग्णालयातील आत्महत्यांमध्ये घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीबी रुग्णालयातील आत्महत्यांमध्ये घट
टीबी रुग्णालयातील आत्महत्यांमध्ये घट

टीबी रुग्णालयातील आत्महत्यांमध्ये घट

sakal_logo
By

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : क्षयरोगावरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवडी टीबी रुग्णालयात गेल्या दोन वर्षांत एकाही रुग्णाच्या आत्महत्येची नोंद झाली नसली, तरी हिंसक होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचे माहिती अधिकारातून पुढे आली आहे. वरील प्रकार रोखण्यासाठी क्षयरोग रुग्णालयात विविध उपाययोजना आखल्या जात असल्याचे प्रशासनाने सांगितले.
क्षयरोग रुग्णालयात गेल्या पाच वर्षांत रुग्णांनी केलेल्या आत्महत्या आणि हिंसक घटनांची माहिती ‘आरटीआय’मधून समोर आली आहे. त्यानुसार, २०१७ ते २०२२ या कालावधीत केवळ दोन रुग्णांनी आत्महत्या केल्या होत्या. विशेष म्हणजे या दोन्ही आत्महत्या २०१९-२० मध्ये झाल्या आहेत. त्यानंतर रुग्णालयात आत्महत्येची एकही घटना घडलेली नाही.
आत्महत्येचे प्रमाण कमी झाले असले, तरी रुग्णांच्या हिंसक होण्याचे प्रमाण वाढले आहे. गत पाच वर्षांत ४२ रुग्ण हिंसक झाल्याची नोंद करण्यात आली. ही संख्या दरवर्षी वाढत आहे. २०१७ मध्ये रुग्णांमध्ये हिंसाचाराची एकूण पाच प्रकरणे होती, ती २०२२ मध्ये वाढून ११ पर्यंत वाढली. याशिवाय क्षयरोग रुग्णालयांमध्ये टीबीने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होत आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, गत पाच वर्षांत टीबी रुग्णालयात सहा हजार ३८८ रुग्णांचा मृत्यू झाला असला, तरी मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे.
---
टीबी रुग्णांचे मृत्यू
वर्ष-------- संख्या
२०१७-१८ - १६०६
२०१८-१९ - १४७९
२०१९-२० - १३८६
२०२०- २१ - ८९३
२०२१-२२ - १०२४
---
क्षयरुग्णांच्या आत्महत्येमागे अनेक कारणे आहेत. एकटेपणा आणि सातत्याने घ्यावी लागणारी औषधे, यामुळे रुग्णांना कंटाळा येतो. याबाबत आम्ही रुग्णांचे वेळोवेळी समुपदेशन केले करतो. त्यासाठी पाच मानसोपचारतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. नम्रता कौर, अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95086 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..