बांगरचोळे शाळेत लोकसहभागातून उभारली शेड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांगरचोळे शाळेत लोकसहभागातून उभारली शेड
बांगरचोळे शाळेत लोकसहभागातून उभारली शेड

बांगरचोळे शाळेत लोकसहभागातून उभारली शेड

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ३० (बातमीदार) : दुर्गम आदिवासी भागात मोलाचे योगदान देणाऱ्या गुंज फाऊंडेशनकडून लोक सहभागातून बांगरचोळे जिल्हा परिषद शाळेत २०×३५ आकाराचे मुलांना जेवण्यासाठी शेड तयार करण्यात आले होते. तसेच शाळेला किचन शेड नसल्यामुळे शाळेचा स्वयंपाक बनवणे व मुलांना जेवायला बसने फार अवघड झाले होते. ही बाब गुंज फाऊंडेशनला सांगून त्यांनी शाळेत लोक सहभागातून शेड उभे करून शाळेची अडचण दूर केली आहे. शेड बनवण्यासाठी गावातील ६२ कुटुंबांनी श्रमदान केले होते. त्यांना गृहोपयोगी व धान्य याचे किट प्रत्येक कुटुंबाला देण्यात आली. तसेच शाळेतील मुलांना शैक्षणिक, तसेच बौद्धिक विकास वाढवण्यासाठी खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. या कामासाठी गुंज फाऊंडेशनचे अविनाश राजेश चव्हाण, त्यांचे सहकारी, शाळेचे मुख्याध्यापक बाळू गोटे व प्रकाश राव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवराम सातवी, पोलिस पाटील भिवराज पाटील यांनी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95089 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..