मूर्तीच्‍या रंगकामासाठी महिला आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मूर्तीच्‍या रंगकामासाठी महिला आघाडीवर
मूर्तीच्‍या रंगकामासाठी महिला आघाडीवर

मूर्तीच्‍या रंगकामासाठी महिला आघाडीवर

sakal_logo
By

भिवंडी, ता. ३० (बातमीदार) : गणेश चतुर्थीच्या‍ पूर्वसंध्‍येला मूर्तिशाळेत रंगकामाने वेग घेतला असून मूर्तींचे रंगकाम करण्यासाठी आता महिलादेखील पुढे सरसावल्या आहेत.
गणपती पूजेचा दिवस जसजसा जवळ येतो तसतसे मूर्तीच्या कार्यशाळेत मूर्तिकार आणि कारागिरांची धावपळ होते. दर वर्षी मूर्तीसह रंगकाम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा मानस मूर्तिकारांचा असतो. परंतु अनेक कार्यशाळेत काही तरी कारणाने बाप्‍पाच्‍या मूर्तींना उशिरा रंग लागतो. अशा वेळी घरातील महिला वर्ग कार्यशाळेत येऊन रंगकामास मदत करताना दिसतात.
कुंभार समाजातील मूर्तिकारांच्या कार्यशाळेत नेहमी महिला रंगकाम करताना दिसतात. संपूर्ण मूर्तीचे सौंदर्य त्या मूर्तीच्या चेहऱ्यात सामावलेले असते. मूर्तीचा चेहरा रंगवणे म्हणजे आखणी करणे, असे मूर्तिकारांच्या भाषेत बोलले जाते. आखणी करणाऱ्या कारागिरास नेहमी मूर्तीच्या नगाप्रमाणे मोठी रक्कम मिळते. पुरुष कारागिराप्रमाणे काही महिला कारागीर मूर्तीच्या चेहऱ्याची पूर्ण आखणी करतात. ही कला आत्मसात करण्यासाठी फार कष्‍ट घ्‍यावे लागतात. मूर्तीचा चेहरा रंगविण्यास वेळ लागतो. बोलके डोळे, मस्तकी विशिष्ट आकाराचा गंध, डोळ्यांच्या भुवया, मोठी मूर्ती असल्यास सोंडेवर नक्षीकाम, मुकुटावरील सोनेरी शाईकाम, दंताचा सफेद रंग व हसरा चेहरा, कानाच्‍या पाळी असा मानेपर्यंत रंगाने सजावट करण्याचे काम आखणी करणाऱ्या कारागिरांचे असते. ही आखणी लहान व मोठ्या मूर्तींप्रमाणे केली जाते. त्याचा अंदाज घेऊन आखणी केली जाते. मूर्तीला इतर रंगकाम करण्यासाठी सर्वच महिला पुढाकार घेतात. मात्र, काही ठराविक महिला आखणीसाठी पुढे येतात.
मूर्तीच्‍या निर्मितीत महिला अग्रेसर
कार्यशाळेत मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकार मोठे कष्ट घेत असतात. सुरुवातीच्या काळात महिला शाडूची माती मळून देतात. काही महिला प्लास्टरच्या साच्यातून मातीच्या मूर्ती काढण्याचे कामदेखील करतात. या मातीच्या मूर्तीला नंतर हात बसवले जातात, ते बसवण्‍याचे कामदेखील महिला कारागीर करतात. मात्र, मूर्तीला सोंड लावण्याचा अधिकार महिलांना नाही. पुरुषाने गणपतीचा अथवा इतर देवांचा चेहरा लावणे ही मूर्तिकारांची परंपरा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95092 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..