राज्याला मलेरियाचा विळखा; यंदा १० हजार रुग्णांची नोंद; दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malaria
राज्याला मलेरियाचा विळखा

राज्याला मलेरियाचा विळखा; यंदा १० हजार रुग्णांची नोंद; दोघांचा मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असली, तरी पावसाळी आजारांचा ताप मात्र वाढत आहे. मलेरियानेही चांगलेच डोके वर काढले असून राज्यात या तापाच्या तब्बल १० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दोघांचा मलेरियामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. पावसाळ्यात पाणी साचलेल्या ठिकाणांची वाढलेली संख्या, स्वच्छतेचा अभाव, डासांच्या अळ्या नष्ट न करणे, वेळीच उपचार न घेणे अशा विविध कारणांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदाच्या वर्षी २१ ऑगस्टपर्यंत मलेरियाच्या सुमारे १० हजार १२५ रुग्णांची नोंद झाली, दोघांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी ऑगस्टअखेरपर्यंत १० हजार ४२ रुग्ण आढळले होते, तर पाच जणांचा मृत्यूची नोंद झाली होती. तसेच आतापर्यंत राज्यातील ९८ जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे. चिकनगुनियाची फैलाव वाढला असून ५६३ रुग्णांची नोंद झाली. २१ ऑगस्ट २०२२ पर्यंत राज्यात डेंगीचे दोन हजार ५६३ रुग्ण सापडले, हेच प्रमाण गतवर्षी पाच हजार ९७१ एवढे होते.

तपासणी करण्यावर भर
मलेरियाचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये वाढतो. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. डासांची उत्पत्तिस्थळे रोखण्यासोबत बांधकाम क्षेत्रे, पाणी साठून राहणाऱ्या जागांवर औषधांची फवारणी तसेच अधिक लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांमध्ये वैद्यकीय तपासण्या करण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

साथीचे आजार असलेल्या भागात विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरडा दिवस पाळणे, स्वच्छता राखणे आदी बाबींवर भर दिला जात आहे.
- डॉ. महेंद्र जगताप, राज्य कीटकशास्त्रज्ञ

मुंबईतील रुग्णसंख्या (१ ते २८ ऑगस्ट)

मलेरिया ७३६

डेंगी १४७

चिकनगुनिया ३

गॅस्ट्रो ४४४

लेप्टो ६१

कावीळ ५१

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95115 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..