उत्सव श्रींचा जागर पर्यावरणाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्सव श्रींचा जागर पर्यावरणाचा
उत्सव श्रींचा जागर पर्यावरणाचा

उत्सव श्रींचा जागर पर्यावरणाचा

sakal_logo
By

वसई, ता. ३० (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात श्रींचे आगमन जल्लोषात होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी भाविकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात येणार आहे. यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे. धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नागरिक एकवटणार आहेत. त्यामुळे उत्सव श्रींचा जागर पर्यावरणाचा असा दुहेरी संगम पाहावयास मिळणार आहे. जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण पाहता यंदा पर्यावरणावर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. यासाठी प्रशासनाकडूनदेखील प्रोत्साहन देण्यात येत आहे.
जलप्रदूषण रोखण्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन गरजेचे आहे. जिल्ह्यात तलाव, विहिरी, बावखलांचे प्रमाण अधिक आहे; परंतु जलप्रदूषणचा फटका बसत असल्याने पाण्याचे अनेक स्रोत कमी होऊ लागले आहेत. अशातच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रींच्या माध्यमातून पर्यावरणाचा जागर करण्यात येणार आहे. यासाठी विसर्जन करताना कृत्रिम तलाव, हौद, फिरते तलाव, मूर्तीसंकलन केंद्रांना पसंती दिली जाणार आहे. वसई विरार महापालिकेने त्यासाठी तलावात विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात अनेक भागात या संकल्पनेला चालना मिळणार आहे. सार्वजनिक मंडळाकडून देखावे तयार करतानादेखील पर्यावरण बचाव मोहीम आखली गेली आहे; तर प्लास्टिक, थर्माकॉलवर बंदी घातली असल्याने घरगुती व सार्वजनिक मंडळात असे साहित्य हद्दपार असेल.
--------------------------------
बक्षिसांची लयलूट
शासनाच्या राज्यस्तरीय विभागाकडून नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी यंदा पुरस्कार जाहीर होणार आहेत. ५ लाखांपासून ते अगदी २५ हजार रुपये इतके बक्षीस मिळणार आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने मंडळांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.
----------------------------------
पक्षीय चढाओढ
जिल्ह्यात बॅनर, होर्डिंग्जसह वर्गणीसाठी पक्षीय चढाओढ सुरू झाली आहे. सार्वजनिक मंडळाच्या प्रवेशद्वारावर आपलेच बॅनर कसे झळकतील, याची जणू काही स्पर्धाच रंगली आहे. त्यातच शिंदे गटाचे किती बॅनर जिल्ह्यात दिसणार आहेत, यावरून पुढचे राजकीय समीकरणदेखील स्पष्ट होणार आहे.
----------------------------------
जिल्ह्यात एकूण ५९ हजाराहून अधिक मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. घरगुती श्रींना करण्यात येणारी सजावट, देखावा, पर्यावरण जनजागृती मी सामाजिक बांधिलकी आदींवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था, पक्ष आदींनी गणेशोत्सव सुंदर देखावा स्पर्धादेखील आयोजित केल्या असून, फोटो पाठवा व बक्षीस मिळवा, असे आवाहन केले आहे.
---------------------------------
ढोल पथकात महिलांची चुणूक
सावर्जनिक मंडळात गणपती आणताना व विसर्जन करताना ढोल-ताशा पथकाला पसंती दिली जाते. दोन वर्षांनंतर ढोलताशा पथकाला संधी मिळाली असून महिलांचे प्रमाणदेखील अधिक असणार आहे.
-------------------------------
वसई विरार महापालिकेने नऊ प्रभागात १८ कृत्रिम तलाव, १९ गणेशमूर्ती संकलन केंद्र; तर फिरत्या हौदांची १३ ठिकाणी व्यवस्था केली आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक विसर्जन पार पडणार आहे.
---------------------------
वसई विरार शहर महापालिकेकडून यंदा कृत्रिम तलाव, फिरते तलाव संकल्पना राबवली जात आहे जेणेकरून जलप्रदूषण रोखता येईल, सार्वजनिक मंडळ व घरगुती गणेशभक्तानी सहकार्य करावे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका
----------------------------
वसई : श्रींची मूर्ती नेताना चिमुकल्यांचा उत्साह.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95116 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..