५२ वर्षांपासून सामाजिक उपक्रमांचा वसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५२ वर्षांपासून सामाजिक उपक्रमांचा वसा
५२ वर्षांपासून सामाजिक उपक्रमांचा वसा

५२ वर्षांपासून सामाजिक उपक्रमांचा वसा

sakal_logo
By

शुभांगी पाटील ः सकाळ वृत्तसेवा
तुर्भे, ता. ३० ः नवी मुंबईत पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळख असलेल्या शिवछाया मित्र मंडळाचे यंदा ५२ व्या वर्षात पदार्पण होत आहे. सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असलेले मंडळ म्हणून नवी मुंबईत परिचित आहे.
तुर्भे नाक्यावर ५१ वर्षांपूर्वी दिवंगत बबन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अगदी साधेपणी सुरू झालेला हा गणेशोत्सव आज नवी मुंबईचा मानबिंदू ठरला आहे. हा बाप्पा नवी मुंबईचा राजा म्हणूनदेखील सुपरिचित आहे. म्हणूनच १० दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात नवी मुंबईसह विविध भागातील जवळपास दहा लाख भाविक सहभागी होतात. यंदा मंडळाकडून अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी’च्या प्रतिकृतीचा देखावा साकारण्यात आला आहे. तसेच या माध्यमातून आजपर्यंत शंभराहून अधिक समाजाभिमुख उपक्रमदेखील राबविले गेले आहेत. या मंडळाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अंकुश वैती, उपाध्यक्ष सुशील घरत, सचिव अशोक कृष्णा पाटील, कोषाध्यक्ष रामकृष्ण मारुती पाटील, सदस्य नंदकुमार पाटील, संजय शंकर गुरव, विजय पाटील, अनिल हेलेकर नेटाने धुरा संभाळत आहेत.
-------------------------------------
शंभराहून अधिक पुरस्कारांचे मानकरी
सणवार, व्रत-वैकल्ये, मनोरंजनाबरोबरच समाजाप्रतीचे दायित्व जपत मंडळाने आरोग्य शिबिर, पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संकटांमध्ये गरीब, गरजूंना मदतीचा हात दिला आहे. त्याचप्रमाणे मंडळाने उभारलेले समाज प्रबोधनात्मक विशेष देखावे नवी मुंबईकरांचे विशेष आकर्षण ठरले आहेत. त्यामुळेच या मंडळाने आत्तापर्यंत शंभरपेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
-----------------------------------------------
या मंडळाकडे नवी मुंबईतील एक आदर्श आणि समाजाभिमुख संस्था म्हणून पाहिले जाते. २०२० हे या सार्वजनिक गणेशोत्वाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते; परंतु कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे संस्थेला सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सव साजरा करता आला नाही; पण संकट काळात राज्यात अडकलेल्या गरजूंना संस्थेकडून भरीव मदत करण्यात आली आहे.
- अंकुश वैती, अध्यक्ष, शिवछाया मित्र मंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95124 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..