अनधिकृत बांधकामावर तोडक कार्यवाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बांधकामावर तोडक कार्यवाही
अनधिकृत बांधकामावर तोडक कार्यवाही

अनधिकृत बांधकामावर तोडक कार्यवाही

sakal_logo
By

घणसोली, ता. ३० (बातमीदार) : अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महापालिकेची कार्यवाही सुरूच असून मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशाने घणसोली विभाग हद्दीतील असलेल्या गोठिवली गावातील २ मजल्याच्या अनधिकृत इमारतीवर तोडक कार्यवाही करण्यात आली.

गोठिवली गावातील मरी आई मंदिराजवळ अनधिकृतपणे २ मजल्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे मनपा विभागकडे तक्रार होती. त्यानुसार या बांधकामावर तोडक कार्यवाही करण्यात आली. ही कारवाई विभाग अधिकारी शंकर खाडे आणि अतिक्रमण अधिकारी रोहित ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी शंकर खाडे यांनी सांगितले की, ही कार्यवाही म्हणजे अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना मनपा प्रशासनाचा हा धाक असला पाहिजे आणि अनधिकृत बांधकामाला कायमचा चाप लागावा, अशी कामे पूर्ण बंद व्हावीत, हा आमचा उद्देश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95135 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..