आरटीओकडून २६ वाहनांचा ऑनलाईन लिलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीओकडून २६ वाहनांचा ऑनलाईन लिलाव
आरटीओकडून २६ वाहनांचा ऑनलाईन लिलाव

आरटीओकडून २६ वाहनांचा ऑनलाईन लिलाव

sakal_logo
By

वाशी, ता. ३० (बातमीदार) : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नवी मुंबई या कार्यालयात महाराष्ट्र वाहन कर कायदा १९५९ तसेच मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदी वापरून वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांनी वाहने अटकाव केलेली आहेत. अटकाव केलेली वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नवी मुंबई येथील चाचणी मैदान येथे असलेल्या जागेत अटकाव केलेल्या स्थितीत ठेवण्यात आलेली आहेत. वायुवेग पथकाने अटकावून ठेवलेल्य एकूण २६ वाहनांचा जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदी वापरून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई यांच्यावतीने १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ई-ऑकशन पद्धतीने जाहीर लिलाव करण्यात येणार आहे; तरी इच्छुकांनी लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले आहे. लिलावाचे अटी व शर्ती तसेच अनामत रक्कम याबाबतची माहिती लिलावाच्या अगोदर ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95136 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..