खारघरमध्ये उभे राहणार सिक्किम भवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमध्ये उभे राहणार सिक्किम भवन
खारघरमध्ये उभे राहणार सिक्किम भवन

खारघरमध्ये उभे राहणार सिक्किम भवन

sakal_logo
By

खारघर, ता. ३० (बातमीदार) : सिक्किम राज्याच्या वतीने खारघरमध्ये सिक्कीम सुस्वास्थम भवन उभारले जाणार आहे. या भवनचे भूमिपूजन सिक्किम राज्याचे राज्यपाल गंगा प्रसाद यांच्या हस्ते पार पडले. या वेळी सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेमजी सिंग, पर्यटन आणि औद्योगिक मंत्री बी. एस. पंथ, आमदार प्रशांत ठाकूर, सिक्किम राज्याचे मुख्य सचिव ज्ञान उपाध्याय उपस्थित होते.
सिक्किम राज्यातील नागरिक नोकरी व उद्योग व्यवसायसाठी मुंबई, नवी मुंबई तसेच पनवेल परिसरत वास्तव्य करीत आहे. तसेच सिक्किम राज्यातून बहुतांश नागरिक मुंबई परिसरात विविध आजाराचे उपचार करण्यासाठी मुंबईत येत असतात. मुंबईमध्ये खोली भाड्याने घेऊन उपचार करू शकत नाहीत. आर्थिक आणि कमकुवत असलेल्या कुटुंबाची हेळसांड होते. या सर्व बाबींचा विचार करून सिक्किमचे राज्याच्या वतीने खारघरमध्ये एक एकर जागेत जवळपास ५२ कोटी रुपये खर्च करून सिक्किम सुस्वास्थम भवन उभारण्यात येणार आहे. या भवनमध्ये ५६ खोल्या असणार आहेत. शिवाय सभागृह, आसाम राज्यातील महिला बचत गटांचे स्टॉलसाठी विक्री केंद्र उभारले जाणार आहे. दोन वर्षात भवनचे काम पूर्ण व्हावेत, हे प्रयत्न असल्याचे मुख्य सचिव ज्ञान उपाध्याय यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या वेळी खारघरमधील भाजपचे माजी नगरसेवक तसेच सिक्किममधील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95141 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..