वसई विरार महापालिकेने केली इमारत जमीनदोस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई विरार महापालिकेने केली इमारत जमीनदोस्त
वसई विरार महापालिकेने केली इमारत जमीनदोस्त

वसई विरार महापालिकेने केली इमारत जमीनदोस्त

sakal_logo
By

वसई, ता. ३० (बातमीदार) : वसई विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती नालासोपारा येथील मोरेगाव परिसरात उभारण्यात आलेली दोन मजली इमारत आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निर्देशानुसार जमीनदोस्त करण्यात आली आहे.
प्रभाग समिती बी मध्ये अनधिकृत इमारत उभारण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांना मिळाल्यानंतर जागेवर प्रत्यक्ष भेट दिली. त्यानंतर प्रभारी सहायक आयुक्त यांनी कर्मचाऱ्यांच्या व पोकलेनच्या सहाय्याने ३ हजार चौरस फूट बांधकाम असलेल्या या इमारत निष्कासित केली. कारवाईदरम्यान अतिक्रमण विभाग प्रमुख हरिश्चंद्र जाधव, अतिक्रमण विभागाचे अभियंता कुणाल घरत, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95145 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..